(हा माझा लेख मायबोली.कॉम वर पूर्वप्रकाशित अाहे त्याचे दुवे)
देवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग १)
देवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग २)
नमस्कार! सर्वसाधारणपणे अापण नेहमी अमुक शब्दाचा ‘अपभ्रंश’ तमुक अाहे असे म्हणतो. जसे की अॉफिस चा अपभ्रंश होअुन हापिस हा शब्द. हॉस्पिटल चे अीस्पितळ, िअ. वरील अुदाहरणे िअंग्रजी शब्दांची अाहेत. मात्र मराठी शब्दांतही असे बदल घडुन येतात. जसेः जाहला – झाला. पण हे सर्व अपभ्रंश अुच्चाराबाबत अाहेत. अपभ्रंशाची सोपी व्याख्या म्हणजे ‘भ्रष्ट नक्कल’. भ्रष्ट म्हणजे जी मूळ प्रतिशी समरुप नाही अशी.
अापण कधी हा विचार केला अाहे का की असा प्रकार अापल्या लिहीण्याच्या पद्धतीत देखील होतो / होअु शकतो? वर्षानुवर्षे देवनागरी लिपी अनेक लोक वापरत अालेले अाहेत. त्यातील अनेक वैशिष्ट्यांमुळे संस्कृत शिवाय अनेक भाषेतील मजकूर जतन करण्यासाठी देवनागरी लिपी वापरली गेली / जात अाहे. मराठी व हिंदी ही नेहमीची अुदाहरणे. मात्र खुप कमी लोकांना हे माहित असेल की देवनागरी लिपी १४ पेक्षा अधिक भाषांसाठी वापरली जाते.
अापल्या पुर्वजांनी देवनागरी लिपी तयार करताना अनेक बाबींचा शास्त्रोक्त विचार केला होता, मात्र वर सांगितल्याप्रमाणे त्यात वेळोवेळी बदल घडत गेले अाणि तत्कालिन कालानुरुप हे बदल ग्राह्य मानले गेले. मात्र अनेक भाषा देवनागरीचा वापर करत अाल्याने त्या त्या भाषेसाठी अनुकूल असेही काही बदल करण्यात अाले अाणि ते काही भाषांपुरते मर्यादित राहिले.
अुदाः हिंदी भाषिकांनी खासकरुन अुर्दू अुच्चारातील बदल कळावा म्हणून नुक्ता (अधोबिंदू ़ कागज़) वापरणे सुरु केले. तसेच काही हिंदी अक्षरे (अ, झ, अंक ५, ८) हे हिंदीत वेगळ्या पद्धतीने लिहीतात.
मराठीत श अाणि ल यांचे लेखन वेगळ्या प्रकारे केले जाते.
केवळ मराठीमध्ये असलेले ‘ळ’ हे विशेष अक्षर हिंदी व संस्कृत मध्ये देखील नाही.
सिंधी भाषादेखील काही ठिकाणी देवनागरीत लिहिली जाते. तिथे काही अक्षरांना अधोरेषा अाहे. (ॻ)
ह्या सर्व नंतरच्या पुरवण्या अाहेत ज्या अापापल्या सोयीप्रमाणे घातलेल्या अाहेत. अॅ व ऑ ह्या अगदी अलिकडच्या मराठीतील भरी!
ह्या भरींबरोबरच काही अक्षरे (मुख्यतः स्वर) त्यांच्या अुच्चारांसकट लयासही गेली अाहेत. जसे की दीर्घ ऋ = ॠ. ऌ व ॡ. ह्यातील ऌ हा मराठीतील क्ऌप्ती ह्या अेकमेव माहित असलेल्या शब्दामुळे जिवंत अाहे.
मात्र मी जो अपभ्रंश म्हणतोय तो हा नव्हे. मूळ देवनागरी लिपीपासून फारकत व्हायला फार पूर्वीपासून सुरुवात झाली असावी. ह्याचे मुख्य कारण एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे केवळ भुर्जपत्रावरील हस्तलिखीताच्या स्वरुपातच हस्तांतर झाले. शिवाय प्रत्येकाच्या लिहीण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे त्यात बदल घडत गेले. छपाईचे तंत्रज्ञान अाल्यावर त्या वेळी वापरात असलेल्या लिपीमधे पुढील बदल घडणे थोडे स्थिरावले.
हे बदल कसे घडले असावेत ते अापण पुढच्या भागात पाहू. मात्र पुढचा भाग लिहीण्यासाठी मला किरण फाॅण्ट ची गरज पडेल कारण लिपी वरील कोणतेही illustration Unicode च्या अावाक्याबाहेर अाहे.
किरण फाॅण्ट http://www.kiranfont.com येथून मोफत मिळवा.
(भाग १ समाप्त)
देवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग २)
काही महत्वाच्या प्रतिक्रिया
limbutimbu | 2 August, 2010 - 23:23
>>>> केवळ मराठीमध्ये असलेले ‘ळ’ हे विशेष अक्षर हिंदी व संस्कृत मध्ये देखील नाही.
माझ्याकडील पुस्तकात, श्री विष्णूसूक्तात दुसरा श्लोक असा आहे
इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधानिदधे पदम
समूहळमस्य पांसुरे
हा ळ नन्तर ल ऐवजी प्रक्षिप्त असेल का? जाणकारान्नी खुलासा केल्यास बरे होईल स्मित
किरण | 3 August, 2010 - 14:28
लिंबू: संस्कृत मध्ये ळ नाही हे नक्की. बरेच संस्कृत शब्द मराठीत आहेत पण काही शब्द ज्यात मराठी रुपात ळ आहे तो संस्कृत मध्ये ल आहे उदा: कमळ = कमल नळ = नल इ.
बहुधा ती प्रिंटींग मिस्टेक असावी.
अथर्वशीर्षातही "ॐ गं गणपतये नमः" आणि "स ग हिता संधी" ह्या २ ठिकाणी ग च्या जागी वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळी चिह्ने वापरलेली मी पाहिली आहेत. काही ठिकाणी आणि आता बर्याच पुस्तकात तर "संहिता संधी" असेही वाचले आहे. अशी बरीच चिह्ने आपण हरवलेली आहेत
उच्चाराबबतही योग्य निरीक्षण. मला तर असे वाटते की आपल्या भाषेचे ते वैशिष्ट पूर्वी तरी नक्किच असे होते की तो शब्द ऐकल्यावर त्याच्या उच्चारावरुनच त्याचा अर्थ अभिप्रेत व्हावा.
जसे सॅड गाणे ऐकल्यावर शब्दांशिवायच ते दु:खी गाणे आहे हे समजावे त्याप्रमाणे.
देवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग २)